महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'शिवसेने'ला पुन्हा झटका - shivsena corporator new mumbai

पुढच्या महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांनी शिवसेनेच्या कारभारावर नाराज होऊन यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक राजू शिंदे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
शिवसेनेचे नगरसेवक राजू शिंदे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

By

Published : Mar 6, 2020, 8:04 PM IST

Updated : Mar 6, 2020, 8:34 PM IST

नवी मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा एक झटका बसला आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजू शिंदे यांनी स्थानिक नेत्यावंर रोष व्यक्त करत राजीनामा दिला आहे. राजू शिंदे यांनी आपला राजीनामा महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे सादर केला. लवकरच राजू शिंदे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घटना ताजी आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला पुन्हा झटका बसला आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'शिवसेने'ला पुन्हा झटका

पुढच्या महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांनी शिवसेनेच्या कारभारावर नाराज होऊन यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजू शिंदे हे लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे. तर शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी राजू शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने तुर्भे परिसरात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा -'सुरुवातीला तर हा पुण्याचाच अर्थसंकल्प असल्यासारखं वाटलं'

काय म्हणाले राजू शिंदे?

"मी कित्येक वर्ष पक्षासाठी मनापासून काम करत होतो. मात्र, असे असूनही पक्षाच्या नेत्यांनी मला नेहमीच नजर अंदाज केले आहे. काही दिवसांपूर्वी, भारतीय जनता पक्षामधून फुटून बाहेर पडलेले आणि शिवसेनेत प्रवेश केलेले, नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत. सुरेश कुलकर्णी तीन वेळा स्थायी समिती सभापती होते. मात्र, तरीही ते तुर्भे येथील रहिवाशांना न्याय देऊ शकले नाही. तसेच त्यांनी इतर नेत्यांवरही कार्यकर्त्यांना आणि स्वतः शिंदे यांना फारच खुजी वागणूक दिली. तसेच संबधित नेतेच पुढेपुढे करतात. म्हणून या नेत्यांच्या मानसिकतेवर नाराज होऊन आपण आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत पक्ष सोडत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Last Updated : Mar 6, 2020, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details