महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vishwanath Bhoir : 'शिवसेना शहर प्रमुख मीच, निर्णय उद्धवजींचा...'; बंडखोर आमदाराने स्पष्ट केली भूमिका

मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी ( Uddhav Thackeray ) पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील, असे स्पष्टीकरण भोईर यांनी दिलं ( Shivsena City Chief Me Say Rebel MLA Vishwanath Bhoir ) आहे.

uddhav thackeray Vishwanath Bhoir
uddhav thackeray Vishwanath Bhoir

By

Published : Jul 15, 2022, 7:05 PM IST

Updated : Jul 15, 2022, 7:11 PM IST

ठाणे - शिवसेनेतील 39 आमदारांना घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. या बंडाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हाव लागलं. तसेच, एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे गटात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हेही सामील आहे. ते कल्याण शहर प्रमुख आहे. त्यांनी शिंदे गटात सामील झाल्यावर त्यांच्या शपर प्रमुख पदाबाबत वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यावर आता विश्वनाथ भोईर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी ( Uddhav Thackeray ) पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील, असे भोईर यांनी म्हटलं ( Shivsena City Chief Me Say Rebel MLA Vishwanath Bhoir ) आहे.

'हा सर्वस्वी त्यांचा निर्णय' -प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार भोईर म्हणाले की, शहर प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत, त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असेल तर ते ठेवतील, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केलं आहे.

विश्वनाथ भोईर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'...हा भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न' - नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबतचा जो निर्णय आहे, तो मंत्रिमंडळात होईल. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र, सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. पण, दि. बा. पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरु. हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न असून, या भूमिपुत्रांचा आक्रोश आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेणार, असेही भोईर यांनी म्हटलं.

"गद्दाराची व्याख्या काय ही ‘त्या’ लोकांनी जाहीर करावी" -महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, याचा अर्थ आम्ही गद्दार नाही, मी शिवसैनिकच आहे. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको. महाविकास आघाडीतून बाहेर पडून जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी, असं आवाहन देखील विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे.

हेही वाचा -Raj Thackeray : शिंदे-भाजप सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रीपद?; राज ठाकरे म्हणाले, 'त्या सर्व बातम्या...'

Last Updated : Jul 15, 2022, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details