ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार सचिन बासरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक आयोगातर्फे शुक्रवारी त्यांना नगरसेवकपदाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यावर नगरसेवकाचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने या प्रभागात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, या प्रभागातून एकच उमेदवार सचिन बासरे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित होती. तर इतर कोणीही उमेदवार नसल्याने आपला विजय घोषित करण्यात यावा, अशी मागणी सचिन बासरी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बासरे यांचे नाव घोषित करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते.