नवी मुंबई - गेल्या कित्येक दिवसापासून मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली अटीतटीची लढाई अखेर संपली. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिकांनी आपला आंनद मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये जल्लोष.. - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिकांनी आपला आंनद मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये जल्लोष
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये जल्लोष
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर शपथ घेताच नवी मुंबईतील ऐरोली येथील शिवसेनेच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे, लाडू भरवत शुभेच्छा दिल्या. फटाके फोडून, नाचून, आपला आनंद व्यक्त केला. शिवसेनेचे अॅड. रेवेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.