ठाणे- सातारा-जावळी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यातील मतदारांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. आतापर्यंत कुठलाही उमेदवार आपला ग्रामीण भागातील मतदापसंघ सोडून प्रचारासाठी शहारात आलेला दिसला नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठाणे, मुंबई येथे जाऊन आपला अनोख्या पद्धतीने प्रचार करीत मतदारांना आवाहन केले.
दि ग्रेट जावळी महाबळेश्वर प्रतिष्ठान यांनी ठाण्यात ऐका मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मतदारांची भेट घेण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले आले होते. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री व मुळचे साताऱ्यातील रहिवासी एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील हजारो मतदार मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी तसेच मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले भेटी घेत आहेत. सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक लागली आहे.