महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघांना अटक; तीन फरार - मानपाडा पोलीस स्टेशन

पार्किगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून अन्य तिघांचा शोध सुरू केला आहे. आरोपी शरद शेट्टे याच्यासह शिवसेना पदाधिकारी समीर मोरे व अन्य एकास अटक केली. तर रणजीत झा असे अपहरण करून बेदम मारहाण झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.

आरोपीला अटक
आरोपीला अटक

By

Published : May 8, 2021, 9:13 PM IST

ठाणे - पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून अन्य तिघांचा शोध सुरू केला आहे. आरोपी शरद शेट्टे याच्यासह शिवसेना पदाधिकारी समीर मोरे व अन्य एकास अटक केली. तर रणजीत झा असे अपहरण करून बेदम मारहाण झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.

4 साथीदारांच्या मदतीने आरोपीने केले व्यवसायिकाचे अपहरण

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीत रणजीत झा यांची फॅक्टरी आहे. ते दररोज दिवा येथील बी. आर. नगर परिसरातील त्यांच्या जागेवर असलेल्या मंदिरात पूजेसाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी गाडी पार्किगवरुन आरोपी शरद शेट्टे सोबत रणजीत झा यांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन आरोपी शरद शेट्टे याने रणजीत यांना धमकी दिली होती. अखेर शरदने आपल्या 3 ते 4 साथीदारांच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झा यांना जबरदस्तीने गाडीत कोंबून नेऊन बेदम मारहाण केली. मात्र व्यावसायिक झा यांच्या मुलाने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली.

अवघ्या काही तासांत अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका

मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत झा यांना शोधून त्यांची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली. या मारहाणीत रणजित जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी शरद शेट्टे याच्यासह शिवसेना पदाधिकारी समीर मोरे व अन्य एकास अटक केली. तर उर्वरित तीन आरोपींचा स. पो. नि. श्रीकृष्ण गोरे आणि त्यांचे पथक शोध घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details