ठाणे - आयुष्यभर शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहिलेल्या 64 वर्षीय कट्टर शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आयुष्याच्या अशा वळणावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उशाजवळ ठेवून पूजा करत आहे. नंदकुमार सावंत, असे त्या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुबीयांनी राहते घर विकले, जवळचे सर्व पैसेही उपचारासाठी खर्च केल्याने सध्या सावंत कुटुंबीय हालाखीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांनी उपचारसाठी एकत्र येऊन मदत करावी, अशी याचना केली आहे.
दिवंगत बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा कायम
शिवसेना स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे नेहमीच बोलत असत की, शिवसेनेत 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हाच ध्यास नंदकुमार यांनी मनात ठेवून शिवसेनेसोबत नाळ जोडली. त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ बाळासाहेबांवर असलेली श्रद्धाच त्यांनी आतापर्यंत कायम ठेवली. नंदकुमार मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवाशी असून ते मुंबईतील करीरोड परिसरातच लहानाचे मोठे झाले. तर गोदरेज कंपनीत कार्यरत होते. मात्र, कालातंराने मुंबई सोडून त्यांनी ठाण्यातील किसननगर भागात स्वतःचे घर घेऊन राहत होते.
राहते घर विकून उपचारावर खर्च