ठाणे : राज्यात शिंदे फडणवीस सरकार वेगाने काम करत आहेत. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्यांना हे सरकार पडणार, अशी स्वप्न पडत असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी जे आता शिल्लक राहिलेले आहेत यांच्या देखील बैठका मातोश्रीवर सुरू आहेत. या लोकांना आपल्याकडे टिकवणे हे मोठे आव्हान मातोश्रीच्या समोर आहे आणि या लोकांना टिकवण्याकरिता त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याकरिता अशाप्रकारची वक्तव्य केले जात असल्याचा आरोप, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shinde group spokesperson Naresh Mhaske ) यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.
Naresh Mhaske : ठाकरे गटातील उरलेले आमदार-खासदार शिंदे गटात येणार, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंचे भाकीत....
राज्यात शिंदे फडणवीस सरकार वेगाने काम करत आहेत. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्यांना हे सरकार पडणार, अशी स्वप्न पडत असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी जे आता शिल्लक राहिलेले आहेत यांच्या देखील बैठका मातोश्रीवर सुरू आहेत. या लोकांना आपल्याकडे टिकवणे हे मोठे आव्हान मातोश्रीच्या समोर आहे आणि या लोकांना टिकवण्याकरिता त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याकरिता अशाप्रकारची वक्तव्य केले जात असल्याचा आरोप, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shinde group spokesperson Naresh Mhaske ) यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.
ठाकरे गटातील आमदार खासदार शिंदे गटात येणार - पक्षात शिल्लक असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे टिकवणे हा मोठा टास्क मातोश्रीच्या समोर आहे आणि या लोकांना टिकवण्याकरिता त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याकरिता अशाप्रकारची वक्तव्य केले जात आहे की लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागेल, मध्यवर्ती निवडणूक लागतील अशा प्रकारची वक्तव्य फक्त उरलेली शिवसेना टिकवण्याकरिता कार्यकर्ते आपल्या सोबत आपल्या पक्षात ठेवण्याकरिता आहे. परंतु कार्यकर्ते दुधखुळे नाहीयेत त्यांना सर्व परिस्थिती माहित आहे. उरलेले आमदार आणि खासदार आहेत त्यांच्यापैकी बहुतांश आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांना लवकरच आपला पाठिंबा देणार असल्याचे भाकीत, नरेश म्हस्के ( Naresh Mhaske ) यांनी यावेळी बोलताना केले.
उद्धव ठाकरेंसोबत असलेली कार्यकर्ते देखील सोबत येणार - मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीं दरम्यान लक्षात आले आहे की, सर्वच जिल्ह्यांमधील जे ॲक्टिव काम करणारी मंडळी आहेत, पक्षाकरीता काम करणारी मंडळी आहेत ती जवळ जवळ सर्वच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्या बरोबर काम करत आहेत. आता जी उरलेली लोक आहेत त्यातील सुद्धा ७० ते ८० टक्के लोक कुंपणावर आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हस्के यांनी यावेळी सांगितले.