ठाणे- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
शेअर प्रवासी वाहतूकीवर बंदी हेही वाचा -बांधकामाच्या वादातून शिवसैनिक भिडले; ठाण्यातील प्रकार
शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया-पिवळया जीपमधून सर्वसामान्य प्रवासी शेअरींगव्दारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात. त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतूक करणारी वाहने 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारऱ्या व्यक्ती, संस्था, संघटने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले आहे. जीवनावश्यक सेवेंच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांकसाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा -गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक