महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shambhuraje Desai: गेलेल्या उद्योगापेक्षा मोठे उद्योग आणू, शंभुराजे देसाईंची घोषणा - Shamburaje Desai announce

महाविकास आघाडीच्या काळात उद्योगसमूहांशी कोणीच चर्चा केली नाही व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकच न झाल्याने उद्योग अन्य राज्यात गेल्याचा आरोप (maharashtra project to gujrat) ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी केला.

Shambhuraje Desai
शंभूराजे देसाई

By

Published : Oct 31, 2022, 7:58 PM IST

ठाणे:महाविकास आघाडीच्या काळात उद्योगसमूहांशी कोणीच चर्चा केली नाही व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकच न झाल्याने उद्योग अन्य राज्यात गेल्याचा आरोप (maharashtra project to gujrat) ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी केला. पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी जिजाऊ सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कृतज्ञतेची भाऊबीज या कार्यक्रमाच्या वेळी देसाई पत्रकारांशी संवाद साधत होते.

शंभूराजे देसाई

या सरकारमुळे प्रकल्प बाहेर नाही गेले: गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या काळात भूमिका न घेतल्याने किंवा मदत न मिळाल्याने एकही उद्योग राज्याबाहेर गेला नसल्याचे शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांपेक्षा मोठे उद्योग आणण्यासाठी केंद्राशी चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या व्यक्तींना सुरक्षिततेची आवश्यकता असते त्यांना सुरक्षा देण्याचे व कमी करण्याचे निर्णय राज्य सरकारच्या पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती करते व त्यात आपला हस्तक्षेपण नसल्याचे ते म्हणाले.

शंभूराजे देसाई कृतज्ञतेची भाऊबीज या कार्यक्रमात

शिवसैनिक आमची सिक्युरिटी:शिवसैनिकच आमची सिक्युरिटी या शिवसेना नेत्यांच्या विधानांचे त्यांनी स्वागत केले. एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मद्याच्या बाटल्या काही लोक टेम्पो तसेच वाहने भरून आणतात, अशा नागरिकांवर कारवाई करण्यात येते. एकच व्यक्ती दुसऱ्यांदा गुन्हा करताना आढळली तर तीच्यावर मोक्का लावण्यात यावा, असा प्रस्ताव आपण पोलीस महासंचालकांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शंभूराजे देसाई कृतज्ञतेची भाऊबीज या कार्यक्रमात

ABOUT THE AUTHOR

...view details