महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणचे आंदोलन मागे; तर भिवंडीत 'शाहीनबाग' सुरूच - शाहीनबाग

सीएए, एनआरसी विरोधात देशभर आंदोलने सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील गोविंदवाडी परिसरात शाहीनबागच्या धर्तीवर आंदोलन सुरु होते. पण, रात्री दहानंतर स्पीकर वाजल्याने आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने आंदोलन मागे घेतले आहे.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Feb 5, 2020, 7:58 AM IST

ठाणे- नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असून दिल्लीतील शाहीनबागच्या धर्तीवर कल्याणमध्ये गोविंदवाडी परिसरात आंदोलन सुरु होते. अखेर मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) 14 व्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले. तर भिवंडीतील 'शाहीनबाग' आंदोलन ५ व्या दिवशीही जोरात सुरूच आहे. मात्र, कल्याणातील आयोजकांनी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हे आंदोलन स्वेच्छेने मागे घेत असल्याचे निवेदन दिले.

कल्याणचे आंदोलन मागे; तर भिवंडीत 'शाहीनबाग' सुरूच

कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात 22 जानेवारी पासून केडीएमसी मैदानात 'हम भारत के लोग' या फोरमच्या वतीने नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी शाहीनबागच्या धर्तीवर आंदोलन करण्यात होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक आपला सहभाग नोंदवत होते. त्यातच 11 व्या दिवशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा या आंदोलनाला हजेरी लावून भाषण केले होते. मात्र, रात्री 10 नंतरही स्पिकरवरून सभा सुरु ठेवल्याने 12 व्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी आयोजक तोहिद सैय्यद उर्फ गोल्टी आणि स्पिकरच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आंदोलनाच्या 13 व्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. 3 फेब्रुवारी) महावितरण कंपनीच्या अधिकारांनी मंडपाची वीज जोडणी तोडून बत्ती गुल केली होती. अखेर या आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी आपले आंदोलन स्वेच्छेने मागे घेत असल्याचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले. मात्र, पोलिसांच्या दबावाखाली हे आंदोलन मागे घेतल्याची चांगलीच चर्चा शहरात रंगली आहे.

हेही वाचा - नवी मुंबईतील हुकूमशाही बाजुला करा, नाईकांच्या एकाधिकार शाहीला घाबरुन जाण्याची गरज नाही - अजित पवार

दरम्यान, भिवंडीतील मिल्लतनगर परिसरात शाहीनबागच्या धर्तीवर आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी पाचवा दिवस आहे या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने महिला सहभागी होत असून शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महिलांनी हम कागज नही दिखाएंगे, संविधान को हम बचायेंगे, एनआरसी को रद्द करो रोजगार दो, अशी शपथ घेतली. भिवंडी शाहीनबाग आंदोलनाचा पाचवा दिवस असून जो पर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले आहे.

हेही वाचा - हिरव्या आणि तेलाच्या पावसानंतर डोंबिवलीत आता चक्क गुलाबी रस्ता

ABOUT THE AUTHOR

...view details