महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या - bhivandi murder case

सोनुबाईंच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापगाव येथे राहणाऱ्या सोनुबाई 21 नोव्हेंबरला अचानक गायब झाल्या होत्या. त्यांचा मुलगा माणिक चौधरी याने पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर वडूनवघर या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.

thane
ठाण्यात चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या

By

Published : Dec 10, 2019, 6:48 PM IST

Updated : Dec 10, 2019, 10:55 PM IST

ठाणे -टेलिव्हीजनवरील मालिका पाहून चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी निलम या दोघांना अटक केली आहे. हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव सोनुबाई चौधरी असे असून त्यांची 21 नोव्हेंबला भिवंडीमधील पडघा या ठिकाणी सोनुबाई यांची हत्या झाली होती.

ठाण्यात चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या

हेही वाचा -हैदराबाद, उन्नावनंतर आता रायपूर हादरलं, दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात २ तरुणींचा मृत्यू

सोनुबाईंच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापगाव येथे राहणाऱ्या सोनुबाई 21 नोव्हेंबरला अचानक गायब झाल्या होत्या. त्यांचा मुलगा माणिक चौधरी याने पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर वडूनवघर या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा -बायको कपडे धुवायला सांगायची म्हणून वैतागलेल्या नवऱ्याची आत्महत्या; पुण्यातील घटना

या प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ आणि त्याची पत्नी निलम या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडी आणि सोनुबाई यांच्या गळ्यातील दागिने जप्त केले आहेत. सोमनाथ हा ड्रायव्हर असून त्याची पत्नी नीलिमा ही अंगणवाडी सेविका आहे. त्याने त्याच्या मालकाकडून खोटे बोलून गाडी आणली होती. केवळ मौज मजा करण्यासाठी मौजेच्या वस्तू घेतल्यामुळे झालेल्या कर्जाची परतफेड हप्त्याच्या रूपाने करण्यासाठी हत्या केल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे.

Last Updated : Dec 10, 2019, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details