ठाणे :ठाण्यात कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोशनी शिंदे या महिलेला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. तर याचा निषेध आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी ठाण्यात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मारहाण झालेल्या महिलावरच दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.
उपस्थित राहण्याचे पात्र पाठविले : सदर प्रकरणात महिलेवरील अत्याचाराप्रकरणी राजकीय शिमगा होऊ लागल्याने महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग आणि कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना पत्र पाठवून गुरुवारी(६ एप्रिल) दुपारी १२-३० वाजता सादर प्रकरणाचा आवाहल घेऊन उपस्थित राहण्याचे पात्र पाठविले. मात्र, आज राज्य महिला आयोगाच्या दप्तरी काय घडले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
मारहाणीत सहभाग असलेल्या शिंदे : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवती सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाली आहे. त्यानंतर आता काही घटना घडली तर तुझाही तुझाही रोशनी करीन अशी टॅगलाईन सुरु झाल्याचे चित्र आहे. रोशनी शिंदेला मारहाण करून दोन दिवस उलटले असतानाच या मारहाणीत सहभाग असलेल्या शिंदे गटाच्या माजी नागरसेविकेने उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेने पदाधिकारी असलेल्या महिलेला तशा शब्दांत धमकावले आहे. त्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे तक्रारही केली आहे.
श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारा घेतली नाही : स्मिता आंग्रे राहणार रत्नदीप भवन, रूम नं ५, किसननगर नं ३, वागळे इस्टेट ठाणे या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अधिकारी (उद्धव ठाकरे) पदावर काम करीत आहे. ५ एप्रिल, २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाच्या आणि अरोशनी मारहाण प्रकरणात नाव आलेल्या माजी नगरसेविकेने व्हाट्सअप कॉलवर धमकावले. रोशनीची हालत बघितली ना ? आता तुझा नंबर आहे. तिच्या सारखीच हालत करू अशी धमकी देण्यात आली. तक्रारीत स्मिता आंग्रे यांनी नमूद केले की, आमचा परिवार भयभीत आहे. आमच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो असता तक्रार घेतली नाही. म्हणून ठाणे पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दिल्याचे स्मिता आंग्रे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :Bawankule On Uddhav Thackeray : ...तर भाजप पेटून उठेल; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा