महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे पोलीस दलात आणखी एक कोरोना योद्धा परतला; सहकाऱ्यांनी केले पुष्पवर्षावात स्वागत - वरिष्ठ पोलीस निरिक्षक

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. ठाणे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील दोन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक कोरोनावर मात करून मुंबईतील रुग्णालयातून ठाण्यात परतले.

Thane Police
ठाणे पोलीस

By

Published : Apr 28, 2020, 10:45 AM IST

ठाणे -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्र काम करुन पोलीस दल त्यांना मदत करत आहेत. मात्र, या काळात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. ठाणे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील दोन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

ठाणे पोलीस दलात आणखी एक कोरोना योद्धा परतला

गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक कोरोनावर मात करून मुंबईतील रुग्णालयातून ठाण्यात परतले. परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे आणि इतर पोलीस कर्मचाऱयांनी आनंदनगर चेक नाका येथे पोलीस निरिक्षकांवर फुलांचा वर्षाव केला. टाळ्या वाजवून त्यांचे सर्वांनी स्वागत केले. ठाण्यातील स्वागत स्विकारून हे वरिष्ठ अधिकारी मुळगावी नाशिक येथे रवाना झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details