ठाणे - भाजी विक्रेत्याने गटारात पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार भिंवडीच्या गायत्री नगर भागात घडला. विक्रेत्याचा अद्दल घडावी म्हणून, तेथील काहींनी त्याचा भाजीपाला फेकून दिला आहे.
व्हिडिओ व्हायरल: भाजी विक्रेत्याच्या किळसवाणा प्रकार हेही वाचा -महत्त्वाकांक्षी 'शांतता करार' स्वाक्षरी समारंभाला भारतही राहणार उपस्थित!
गायत्रीनगर परिसरात आज दुपारच्या सुमारास हातगाडीवर भाजीपाला विक्रीसाठी घेऊन विक्रेता रस्त्यावरून जात होता. मात्र, रस्त्याच्या मधोमध झाकण नसलेल्या गटारात त्या विक्रेत्याची हातगाडी अचानक कलंडली होती. त्यामुळे हातगाडीवरील भाजीपाला सरळ सांडपाण्याच्या गटारात गेला. तरीही त्याने सांडपाण्याच्या गटारातून भाजीपाला काढून तो विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याच वेळी काही नागरिकांनी या किळसवाणा प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल केले. काही वेळातच हा व्हिडिओ समाज माध्यमातून अनेकांच्या मोबाईलवर आला.
हा प्रकार पाहताच त्या भाजीपाला विक्रेत्याला काहींनी गाठत त्याने गटारातून काढलेला भाजीपाला नागरिकांनी कचराकुंडीत फेकून दिला. मात्र, या घटनेमुळे त्याच्याकडून ही भाजी विकत घेऊन खाणाऱ्याच्या आरोग्यावरील परिणाम टाळला आहे.
हेही वाचा -'रक्षा खडसे माझ्या आवडत्या खासदार'