मागण्या पूर्ण न झाल्यानं ठाण्यात सुरक्षा रक्षकाची आत्महत्या - demands of Security guard
युनिफॉर्म बदलण्यात यावा आणि वेळेवर पगार मिळावा या त्यांच्या मागण्या होत्या. ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
ठाणे- आपल्या रास्त मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकार दरबारी खेट्या मारणाऱ्या सुरक्षा रक्षकाने कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. संतोष हिंगणे असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते कोपरला राहायला आहेत. युनिफॉर्म बदलण्यात यावा आणि वेळेवर पगार मिळावा या त्यांच्या मागण्या होत्या. ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्याला देखील दूरध्वनी करून आपला संयम तुटला असून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.