महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gold Theft Case Thane: ज्वेलर्सच्या सुरक्षा रक्षकाने तिजोरी गॅस कटरने कापून पळविले 6 किलो सोने - ज्वेलर्सच्या दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून

एका ज्वेलर्सच्या दुकानात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने ज्वेलर्सच्या दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यामधील ६ किलो सोने पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प नंबर एक भागातील विजयलक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडली आहे.

Gold Theft Case Thane
चोरी झालेले दुकान

By

Published : Jun 29, 2023, 5:20 PM IST

सोने चोरी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

ठाणे :सोने पळवून नेणारी टोळी सीसीटीव्हीत कैद झाली असून येथील महेश नावाच्या सुरक्षा रक्षकाने दरोड्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ह्या घटनेनंतर सुरक्षा रक्षक साथीदारासह फरार झाला असून पोलिसांनी ४ पथके तयार करून तपासाची चक्र फिरवली आहेत.

6 किलो सोने लंपास :पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक भागातील शिरू चौकात पुरुषोत्तम बदलानी यांच्या मालकीचे विजयलक्ष्मी ज्वेलर्स आहे. हे ज्वेलर्स दुकान मंगळवारी २६ जून ते २७ जूनच्या सकाळपर्यत बंद होते. याच सुमारास दुकान बंद असल्याची संधी साधून याठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने चार ते पाच साथीदारांच्या मदतीने गॅस कटरच्या साह्यायाने तिजोरीचे लॉक तोडून तब्बल ६ किलो सोने लंपास केले.

डीव्हीआर नेला पळवून :विशेष म्हणजे, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील या टोळीने तोडफोड करून डिव्हीआर पळवून नेला आहे. पळवून नेलेल्या ६ किलो सोन्याची किंमत ६ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विविध तपासकामी चार पथक नेमले आहेत. पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

चौकशी न करताच ठेवले कामावर:फरार असलेला सुरक्षा रक्षक हा गेल्या १५ दिवसांपूर्वीच ज्वेलर्समध्ये कामाला आला होता. खळबळजनक बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकाची कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा आयडी फ्रुप संबंधित ज्वेलर्स मालकाने न विचारता त्याला कामावर ठेवल्याचे समोर आले. त्यामुळे हा मास्टर माईंड सुरक्षा रक्षक लवकर सापडणे पोलिसांसमोर एक आवाहन उभे राहिले आहे.

हेही वाचा:

  1. Suicide : आत्महत्या करणारी विवाहित महिला पोलीस नाही, तपासात धक्कादायक खुलासा
  2. Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कमरेला स्पर्श करून गेली
  3. love relationship break up : प्रेम संबंध तोडल्याने विवाहित महिलेने पुण्यातून केले तरुणाचे अपहरण

ABOUT THE AUTHOR

...view details