महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन मागवला मोबाईल फोन ; मिळाले खेळण्यातील पत्ते आणि कमरपट्टा

ऑनलाईन खरेदीदरम्यान कल्याण येथील तरुणाची  फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या तरुणाला मोबाईल फोन ऐवजी खेळण्यातील पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे.

ऑनलाईन खरेदीदरम्यान कल्याण येथील तरुणाची  फसवणुक

By

Published : Jul 25, 2019, 7:55 PM IST

ठाणे - ऑनलाईन खरेदीदरम्यान फसवणुकीचे दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. कल्याण येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्रिलोक पांडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्रिलोकला मोबाईल फोन ऐवजी खेळण्यातील पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे.

ऑनलाईन खरेदीदरम्यान कल्याण येथील तरुणाची फसवणुक
त्रिलोक हा कल्याणच्या चिकन घर परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करतो. 12 जुलै रोजी त्याला एका महिलेचा फोन आला होता. या महिलेने तुमच्या मोबाईल नंबरवर एका मोबाईल कंपनीची खास सवलत असून, महागडा मोबाईल उद्या साडे चार हजार रूपयांत मिळणार आहे. त्याच्या जोडीला घड्याळ आणि चष्मा मोफत मिळणार असल्याचे सांगितले होते. या आमिषाला बळी पडून त्रिलोक याने फोनची डिलिव्हरी करण्यास सांगितले होते. त्यानंतर 14 जुलै रोजी तुमचा मोबाईल स्पीड पोस्टने पाठवला असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्रिलोकने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन साडे चार हजार रूपये भरले. पार्सल उघडून पाहिल्यानंतर खोक्यामध्ये मोबाईल ऐवजी खेळण्यातील पत्त्यांची दोन पाकीटे आणि दोन कमरेचे पट्टे होते. याबाबत त्यांनी पोस्ट ऑफिसकडे विचारणा केली. आमचे काम केवळ पार्सल देण्याचे आहे, असे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्रिलोक यांनी सांगितले आहे. आपली फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details