महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेजर कौस्तुभ राणे यांचा आज दुसरा स्मृतीदिन, स्मारकाला अभिवादन - मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. या घटनेला आज दोनवर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे मेजर राणेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी कनिका राणे सैन्य दलात भरती झाल्या आहेत. आज मेजर कौस्तुभ राणे यांच्या मीरा भाईंदर येथील स्मारकासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली.

Veermaran to Major Kaustubh Rane
स्मारकाला अभिवादन

By

Published : Aug 7, 2020, 7:41 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे)- ७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांना वीरमरण आले होते. घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय जवानांनी केला. यामध्ये मिरारोडमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरगती प्राप्त झाली. आज कौस्तुभ राणे यांच्या वीरमरणाला २ वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर मिरारोडमधील मेजर कौस्तुभ राणे स्मारकास आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मेजर कौस्तुभ राणे यांचे कुटुंबातील सदस्य, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर, आयुक्त डॉ. विजय राठोड तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

७ ऑगस्ट २०१८ रोजी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर मध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना, दहशदवाद्यांच्या कट हाणून पाडण्यासाठी भारतीय जवानांनी हल्ला केला. यामध्ये भारतीय सैन्य दलाला चार दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. परंतु ही चकमक मध्यरात्र सुरू होती. यामध्ये सकाळी ५ वाजता दहशदवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले .मेजर कौस्तुभ राणे यांचं बालपण, शिक्षण मिरारोडमध्ये झाले. लहानपणा पासून सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्यामुळे, पुढील शैक्षणिक शिक्षण घेतल्यानंतर,कौस्तुभ राणे यांनी पुण्यातून लष्करी शिक्षण घेतले. त्यानंतर २०१० मध्ये संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण घेतल्या नंतर ऑक्टोबर २०११ मध्ये सैन्यात लेफ्टनंट पद बहाल करण्यात आले.चांगली कामगिरी बजावल्यामुळे २०१३ ला पदोन्नती कॅप्टन पदावर झाली. त्यांनतर २०१८ ला मेजर झाले आणि राष्ट्रपतीच्या हस्ते शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

मेजर कौस्तुभ राणे याच्या कुटुंबात वडील प्रकाशकुमार राणे हे टाटा कंपनीतून निवृत्त झाले. तर आई ज्योती राणे बोरिवली मधील एका शिक्षण संस्थेत होत्या. ते सुद्धा निवृत्त झाल्या आहेत.एक लहान बहीण आहे ती शिक्षण घेत आहे. पत्नी कनिका राणे आणि साडे तीन वर्षांचा मुलगा आहे. दीड वर्षाचा मुलगा असताना वडिलांचं छत गेल्या नंतर पत्नी कनिका राणे यांनी कौस्तुभ राणे याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी सैन्यात दाखल होणार असे सांगितले आणि पतीच्या निधनानंतर कनिका राणे यांनी एकाच वर्षात सैन्य दलात भरती होण्यासाठी परीक्षेत अव्वल गुण घेत पास झाल्या.

पुढील प्रशिक्षण चेन्नईमध्ये पूर्ण केले आणि सैन्य सेवेत दाखल झाल्या. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, पुढील पिढीला प्रेरणा मिळावी तसेच मीरा भाईंदरमधील सुपुत्र म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेल्या माध्यमातून मिरारोड स्थानका बाहेर १५ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य स्मारक उभारण्यात आले. आज २ वर्ष पूर्ण झाले, त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्या स्मारकास आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राणे कुटूंबीय महापौर जोस्ना हसनाळे,उपमहापौर हसमुख गेहलोत, आयुक्त डॉ. विजय राठोड, सर्व पक्षीय नगरसेवक व शहरातील नागरिक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details