ठाणे -कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 15 मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाथिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा -सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली; विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेतला आहे. शाळाबरोबरच वसतिगृहे आणि आश्रमशाळादेखील बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश जिल्ह्यातील महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात लागू राहणार नाहीत. उर्वरित भागात म्हणजेच ठाणे ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, मुरबाड, शहापूर येथे हे आदेश लागू राहणार आहेत.
हेही वाचा -कोरोना लसीकरणास नकार, वृद्धाची थेट पंतप्रधानांकडे तक्रार
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे या भागात लवकरच लॉकडाऊनबाबत निर्णय पालिकेच्या प्रशासनकडून घेतला जाणार आहे.