महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्याचा ठाणे महानगरपालिकेचा घाट; पर्यावरणप्रेमींचे 'तिरडी' आंदोलन - ठाणे महानगरपालिका

ठाणे महापालिका, मेट्रो विकासाच्या नावावर वृक्षतोड करून पर्यावरण भकास करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ठाणे महापालिका टीएमसी नसुन 'ट्री मर्डरींग कंपनी' असल्याचा उपहासात्मक उल्लेख धर्मराज्य पक्षाचे नितिन देशपांडे आणि महेशसिंग ठाकूर यांनी केला.

ठाणे मेट्रोसाठी 3 हजार 527 झाडांची बेकायदा कत्तल; पर्यावरणप्रेमींचे 'तिरडी' आंदोलन

By

Published : Jun 2, 2019, 9:32 AM IST

ठाणे - शहरात मेट्रो तसेच विविध विकास कामांसाठी तब्बल 3 हजार 527 वृक्षांची कत्तल करण्याचा घाट ठाणे महानगरपालिकेने घातला आहे. असा आरोप करत, याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण आणि धर्मराज्य पक्षाच्यावतीने आज घोडबंदर रोडवरील कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोडवर वृक्षांचा प्रतिकात्मक अंत्यविधी करण्यात आला. यावेळी शेकडो वृक्षप्रेमी आंदोलकांनी हातात फलक झळकवत चिपको आंदोलन केले. आंदोलकांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पर्यावरणप्रेमी बोलताना.....


ठाणे महापालिका, मेट्रो विकासाच्या नावावर वृक्षतोड करून पर्यावरण भकास करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ठाणे महापालिका टीएमसी नसुन 'ट्री मर्डरींग कंपनी' असल्याचा उपहासात्मक उल्लेख धर्मराज्य पक्षाचे नितिन देशपांडे आणि महेशसिंग ठाकूर यांनी केला.


वृक्षतोड न करता मेट्रो भूमिगत करा, अथवा वृक्षांच्यावरून मेट्रोचे जाळे आखावे. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जर वृक्षतोड झालीच तर न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या तिरडी आंदोलनात अनेक संस्थांचे नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे सुरूवात होणार आहे. या कामामुळे आयोजित मार्गावर असलेले 3 हजार 527 इतकी झाडे तोडावी लागणार आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details