अखेर सावद जिल्हा कोविड रुग्णालयास ऑक्सीजन मिळाले; रुग्ण दाखल करण्यास सुरुवात
मागील वीस दिवसांपासून भिवंडी येथील सावद जिल्हा कोविड रुग्णालयाचे उदघाटन होऊनही ते सुरू झाले नव्हते. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना हे रुग्णालय बंद असल्याने त्यावर टीका होत होती. अखेर, भिवंडी तालुक्यातील सावद येथे जिल्हा कोविड रुग्णालय सुरू झाले आहे.
ठाणे - मागील २० दिवसांपासून भिवंडी येथील सावद जिल्हा कोविड रुग्णालयाचे उदघाटन होऊनही ते सुरू झाले नव्हते. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना हे रुग्णालय बंद असल्याने यावर अशी टीका होत होती. अखेर, भिवंडी तालुक्यातील सावद येथे जिल्हा कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर हे हॉस्पिटल सुरू झाले आहे. तब्बल 12 मेट्रिक टन ऑक्सीजन उपलब्ध झाल्याने सावद येथील 818 बेडचे कोविड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत सुरु झाले आहे.
रायगडच्या जेएसडब्ल्यु प्लँट मधून ऑक्सिजन....
भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी सांगितले की, जिल्हा कोविड रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न होते. परंतु, त्यास ऑक्सीजन न मिळाल्याने अडचण निर्माण होत होती. त्या अडचणींवर मात करून जिल्हाधिकारी यांनी रायगड येथील जेएसडब्ल्यु प्लँट येथून ऑक्सीजन उपलब्ध केले आहे.