महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sansad Adarsh Gram Yojana Thane : खासदार कपिल पाटलांनी दत्तक घेतलेल्या गावात मुबलक पाणी, मात्र विकास कामांचा बोजवारा! - सांसद आदर्श ग्राम योजना

कपिल पाटील ( Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil ) यांनी सांसद आदर्श ग्राम योजने ( Sansad Adarsh Gram Yojana ) अंतर्गत २०१७ साली शहापूर तालुक्यातील सापगाव दत्तक ( Sapgaon adopted in Shahapur taluka ) घेतले. केंद्र सरकारच्या नियमानुसार दोन वर्षात गावातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजा खासदाराने सोडविणे आवश्यक होते.

Sansad Adarsh Gram Yojana Thane
Sansad Adarsh Gram Yojana Thane

By

Published : May 11, 2022, 4:37 PM IST

Updated : May 11, 2022, 5:00 PM IST

ठाणे -भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ( Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil ) यांनी सांसद आदर्श ग्राम योजने ( Sansad Adarsh Gram Yojana ) अंतर्गत २०१७ साली शहापूर तालुक्यातील सापगाव दत्तक ( Sapgaon adopted in Shahapur taluka ) घेतले. केंद्र सरकारच्या नियमानुसार दोन वर्षात गावातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजा खासदाराने सोडविणे आवश्यक होते. या योजने अंतर्गत गावातील पाण्याचा प्रश्न आणि रस्ते विकसित करण्यात आले. मात्र स्थानिक प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे गावातील अनेक समस्या आजही असल्याचे दिसून आले. गावातील अनेक कुटुंब घरकुलची मागणी करत असल्याचे दिसून आले.

ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया



महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला, मात्र... :भिवंडी लोकसभा मतदारसंघात सापगाव नदीच्या काठावर वसलेले गाव असून या नदीत बारमाही पाणी वाहत असते. त्यामुळे गाव दत्तक घेण्यापूर्वी महिलांना नदीवरून घरापर्यंत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र खासदार, मंत्री कपिल पाटील यांनी गाव दत्तक घेताच विविध पाणी योजनेचा निधी वापरून गावात पाण्याच्या टाक्या उभारल्या. या टाकीत थेट नदीतून पाणी उपसा करून प्रत्येक घरात नळावाटे पाणी दिल्याने गावात पाण्याची मुबलक सुविधा होऊन महिलेच्या डोक्यावरील हंडा उतरला. मात्र नदीचे अशुद्ध पाण्यावर गावकरी गुजारा करत असून पाणी शुद्धीचा प्रकल्प गेले कित्येक वर्ष प्रलंबती असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना :पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात सांसद आदर्श ग्राम योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेनुसार प्रत्येक सांसदाने (खासदाराने) आपाआपल्या क्षेत्रात एक गाव दत्तक घेऊन ते २०१६ सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे आहे. शिवाय त्याने २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत, अशी अपेक्षा केली होती. या योजनेसाठी जनभागीदारी आवश्यक आहे. सांसद आदर्श ग्राम योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून, अल्पकाळातील कामे तीन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये गावची स्वच्छता, अंगणवाडीत मुलांचा प्रवेश, गावात झाडे लावणे आणि आरोग्य सुविधा पुरवणे या सारखे कामे करावी लागणार आहेत. तर मध्यम मुदतीची कामे एक वर्षात आणि दीर्घ मुदतीची कामे वर्षापेक्षा अधिक काळता पूर्ण करावी लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे गावाचा वाढदिवसही साजरा करण्यात येतो. त्यादिवशी गावाबाहेरील व्यक्तिंना बोलवून त्यांचा सन्मान करणे, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची जबाबदारीही गाव दत्तक घेणाऱ्या खासदाराचीच असणार आहे.



रस्ते व स्वच्छतेचा प्रश्न २ वर्षात मार्गी :खासदार कपिल पाटील यांनी २०१७ साली गाव दत्तक घेतल्यानंतर सापगावात सिमेंट रस्त्याचे जाळे पसरवले. तसेच गावात स्वच्छता राहावी म्हणून काही ठिकाणी कचऱ्याची साठवून करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा लहान कुंड्या ठेवण्यात आल्या. तसेच आदिवासी पाड्यातही पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. मात्र आदिवासी पाड्यातील स्मशानभूमीचे काम रखडून पडले आहे. त्यामुळे आदिवासींना उघड्यावरच प्रेतावर अंतिम संस्कार करावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.



अंगणवाडीची शाळा भरते ग्रामपंचात कार्यलयात :सापगावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३ हजार १६० आहे. मात्र या संख्यात वाढ होऊन ती पाच हजारांच्या घरात गेली आहे. सापगाव ग्रामपंचात कार्यलयात अगदीच १० बाय १५ खुराड्या सारखे उभे आहे. त्यातच गावात अंगणवाडीची शाळा नसल्याने गावातील ३० ते ४० मुले ग्रामपंचात कार्यलयात शिक्षणाचे धडे गिरवत आहे. तर जिल्हा परिषद निधीतून एक प्राथमिक शाळा नुकतीच उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचात कार्यलयासह अंगणवाडीची शाळा उभारण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गावात वीज पुरवठा सुरु आहे. शिवाय सोलर दिवेही आदिवासी पाड्यावर लावण्यात आली आहे. मात्र इंटरनेटच्या जमान्यात पाहिजे असलेली सुविधा अर्धवट रखडल्याचे दिसून आले.



रोजगार हमी योजना केवळ कागदावरच :गावातील महिला व पुरुषासाठी रोजगार हमी योजना राबविण्यात आली आहे. मात्र गावातील शासनाच्या निधीतील विविध कामे गावकऱ्यांकडून करून न घेता, जेसीबी आणि इतर मशीनच्या साहाय्याने करण्यात येत आम्हाला रोजगारापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप रोजगार हमीच्या लाभार्थी महिलांनी केला आहे. या महिलांना बँकेचे पासबुक व रोजगार हमीचे पुस्तक देण्यात आले. मात्र बँक पासबुकसह रोजगार हमीचे पुस्तक कोरेच आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना कागदावरच दिसून आली आहे.


घरकुल योजनेचा बोजवारा :गावातील बहुतांश गावकऱ्यांना अध्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गावातील काही घरे आजही घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या मते केवळ गावात पाणी आणि रस्ते बांधले म्हणजे गाव समृद्ध झाले असे नाही. आमच्या सारख्या गावात राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घराचाही प्रश्न दत्तक गाव योजनेतून मंत्री कपिल पाटील यांनी सोडवावा, अशी मागणी यावेळी लाभार्थ्यांकडून करण्यात आली आहे.



गावाचा कारभार पंचायत समितीच्या प्रशासनाकडे :सापगाव ग्रामपंचायतमधील लोकप्रतिनिधींचा राजवट गेल्या ८ महिन्यापूर्वी संपुष्टात आल्याने गावाचा कारभार पंचायत समितीच्या प्रशासनाकडे आहे. त्यामुळे गावातील घरकुल योजनेसह पाणी शुद्धी प्रकल्प आणि इतरही सुविधा रखडल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा -Sansad Adarsh Gram Yojana Nagpur : खासदारांनी दिले परंतु ग्रामपंचायतीला सांभाळता नाही आले; नियोजना अभावी पाचगावात पाणी टंचाई

Last Updated : May 11, 2022, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details