ठाणे -मागील तीन ग्रामपंचायती या निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या चौदा गावांपैकी एक गाव असलेल्या 2 हजार लोकवस्ती असलेले नागावला कल्याण लोकसभा क्षेत्रातील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर दत्तक घेतले. मागील अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या या गावाला दत्तक घेतल्यापासून सुविधा मिळायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कल्याण डोंबिवली आणि ठाणे ,नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीवर असलेल्या 14गावांचा प्रश्न मागिल अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामूळे या 14 गावांमधे सुविधा द्यायच्या कशा हा प्रश्न होता. अशात या गावानी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार देखील घातला होता, म्हणून या गावाना सुविधा देण्यासाठी आता त्यांचा समावेश नवी मुंबई महानगर पालिकेत केला आहे. या गावात रस्ता, पाणी, विज या प्रमुख समस्या होत्या. खासदार श्रीकांत शिंदे यानी नागाव हे गाव दत्तक घेतल्यापासुन या गावातील समस्या सुटण्याची सुरवात झाली आहे. या गावात जाण्यासाठीचा रस्ता मोठा बनवून गावाला हायवेशी जोडण्यात आले. त्यासोबत गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना राबवून घरोघरी नळ जोडणी करण्यात आली. त्यासोबत गावातील तलाव गाळ काढून त्याचे सुशोभिकरन करण्यात आले. गावातील शाळा दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामूळे दत्तक घेतलेल्या गावाचा चेहरा बदलून टाकला आहे.
आनखीही समस्या प्रलंबित -गावात 10वी पर्यंत शाळा असावी ही गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. शिवाय गावाला एक प्रमुख मार्ग प्रस्तावित आहे जो खीड़काळी जवळ येतो. यामुळे बरेचसे अंतर वाचू शकते. हा रस्ता व्हावा ही देखील प्रमुख मागणी आहे. आता नवी मुंबई महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर महानगर पालिकेच्या सुविधा मिळाव्यात ही देखील प्रमुख मागणी गावकरी करत आहेत.
14 गावांमध्ये समस्या जवळपास सारख्याच -टायगर परिसरातील 14 गावांचा प्रश्न मागच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक बैठका, मंत्रालयाचे फेरे, नेत्यांची आश्वासनं देऊनही या गावांच्या अडचणी सुटला नाहीत यामुळेच या गावांमध्ये सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. हे मात्र नागाव या चौदा गावांमध्ये एकमेव असं गाव आहे ज्या गावांमध्ये शाळा, रस्ता आणि पाणी या मूलभूत सुविधा व्यवस्थितरित्या नागरिकांना मिळत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावरच केलेल्या कामामुळे नागाव च्या अडचणी कमी झालेल्या आहेत.