भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यात दहीहंडी फोडून संघर्ष समितीने केला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध - रस्त्यातील खड्ड्यात दहीहंडी फोडून निषेध
भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे भिवंडी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यावर दहीहंडी फोडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.
भिवंडीत रस्त्यातील खड्ड्यात दहीहंडी फोडताना संघर्ष समितीचे कार्यकर्ते
ठाणे - भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे नजरेस पडतात. तसेच, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव जवळ येऊन ठेपले आहेत. असे असतानाही पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे भिवंडी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यावर दहीहंडी फोडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.