महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजूरी

गुरुवारी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत, मिरा-भाइर्दंर महानगरपालिका येथील सांस्कृतिक केंद्राला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजूरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजूरी

By

Published : Jan 29, 2021, 5:09 PM IST

मीरा भाईंदर -गुरुवारी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत मिरा-भाइर्दंर महानगरपालिका येथील सांस्कृतिक केंद्राला मंजूरी देऊन, त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

१३ कोटींचा खर्च अपेक्षित

भाईंदर पूर्वेच्या इंद्रालोक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील महसूल खात्याची जमीन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या जागेवर सांस्कृतिक केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रासाठी अंदाजे 13 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील ९०% खर्च राज्य शासन तर १०% खर्च मिरा-भाईंदर महानगरपालिका करणार आहे. या वास्तूच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील या सांस्कृतिक केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती मागणी

दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आंबेडकर अनुयायांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्यण घेण्यात आला आहे. या सांस्कृतिक केंद्रामध्ये विपश्यना केंद्र, लायब्ररी व राहण्याची व्यवस्था होत असल्याने, बाहेरून शहरात येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायांकडून समाधान व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details