ठाणे - लाचप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक गोरख जाधवची (सोमवारी) न्यायलयाने जामीन अर्ज मजूर करीत २५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. ठेकेदाराकडे पालिकेतील निधीतून केल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या विकास कामाची टक्केवारी मागणाऱ्या गोरख जाधवला मागील आठवड्यात बुधवारी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली होती.
लाचखोर शिवसेना नगरसेवकाचा जामीन अर्ज मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका - siddharth kamble
लाचखोर शिवसेना नगरसेवकाचा जामीन अर्ज मंजूर, टक्केवारीची लाच मागितल्यामुळे झाली होती लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई.
कल्याण नजीक असलेल्या आंबिवली परिसरात पालिकेचे ठेकेदारांमार्फत रस्ता व गटार बांधणीचे काम सुरू आहे. या प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक गोरख जाधव यांनी या कामामध्ये कोणताही अडथळा न आणण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम म्हणजेच एक लाख रुपये रकमेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत त्याला अटक करून व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुरुवारी लाचखोर गोरख जाधव याला एसीबीने कल्याण न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस तपासासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पोलीस तपासासाठी पाच दिवसांची म्हणजेच २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपताच जाधव याला एसीबीने कल्याण जिल्हा सत्र न्यायालय -१ समोर हजर केले असता सत्र न्यायालयाने जाधवचा जामीन अर्ज मंजूर करीत २५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली.