ठाणे :१८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai Nagpur Samriddhi Highway) काम ८० टक्क्यांपर्यंत संपले आहे. हे काम ५ जून २०२२ पर्यंत संपण्याची अपेक्षा असतांना कोरोनाच्या २ वर्षांमुळे लांबले. आता जुलै २०२३ मध्ये काम संपवण्याचे लक्ष्य आहे. ६ बोगदे आणि त्यातील १ बोगदा तब्बल ८ किमीचा असे या टप्प्यावर मोठे आव्हान होते. (alternative route to Samriddhi Highway) देशातील सर्वाधिक रुंद असा साडेसात किमीचा शहापूर मधील (Samriddhi Highway Work) वाशाळा बोगद्याचा विक्रम यात केला असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मोपलवार यांनी सांगितले. (work of Samriddhi Highway in Thane district) विशेष म्हणजे इगतपुरी पासून शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंतचा बोगदा पूर्ण करण्याचे अत्यंत जोखमीचे आणि ऐतिहासिक काम अवघ्या २ वर्षांत पूर्ण केल्याची माहितीही त्यांनी दिली. (Latest news from Thane)
‘तर’ आशिया खंडातील पहिला बोगदा ठरणार :समृद्धी महामार्गावरील चौदाव्या पॅकेजमध्ये घाटातील रस्ता, दरीतील पूल, पायस्थासाठीचे ओव्हरब्रिज, अंडर पास आणि वाशाळाचा बोगदा अशी अनेक आव्हाने होती. तरीही जुलै २०२३ पर्यंत हा दुसरा टप्पा पूर्ण करु. त्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत, असेही मोपलवार यांनी सांगितले. ते म्हणाले, डोंगरी भागातील काम हे मोठे आव्हान होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाच्या आत पूर्ण करायचा प्रयत्न आहे. पावसाचे पाणी बोगद्यात शिरु नये यासाठी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर खास छत तयार करण्यात आले. बोगद्यातील सीलिंग लायनिंग, फायर कोटिंग सीलिंग, रस्ता, अग्निरोधक यंत्रणा, व्हेंटिलेशन, लायटिंग पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी दर ३०० मीटरवर सुरक्षाद्वारे बांधण्यात आली आहेत. सुरक्षिततेची आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करणारा शहापूरच्या वाशाळातील बोगदा देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला बोगदा ठरणार आहे, अशी माहिती मोपलवार यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे महामार्गात दोन तुकडे :मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला दिला. परंतु, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे महामार्गात दोन तुकडे झाले आहेत. महामार्गासाठी आवश्यक जमिनी एमएसआरडीसीने ताब्यात घेऊन उर्वरित तुकडे आम्ही ताब्यात घेणार नाही आणि त्यांचा आम्हाला काही लाभ नसल्याने आम्ही त्याचा मोबदला देणार नाही, अशी भूमिका महामंडळाने घेतल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.