महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे - सैराट

२२ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध एका आंतरजातीय मुलासोबत आहेत. मात्र, मुलीच्या बापाचा आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंधाला प्रखर विरोध होता. त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत, तो मुलगा आपल्या कुटुंबासाठी योग्य नाही. त्यामुळे तू त्याच्याशी प्रेमसंबंध तोडून टाक, असे सांगितले.

crime
आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केली मुलीची हत्या

By

Published : Dec 9, 2019, 10:01 PM IST

ठाणे- २२ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध एका आंतरजातीय मुलासोबत आहेत. मात्र, मुलीच्या बापाचा आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंधाला प्रखर विरोध होता. त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत, तो मुलगा आपल्या कुटुंबासाठी योग्य नाही. त्यामुळे तू त्याच्याशी प्रेमसंबंध तोडून टाक, असे सांगितले. मात्र, त्या मुलीने त्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरुच ठेवले, याच रागातून बापाने मुलीचे दोन तुकडे करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या असून अरविंद तिवारी (४५) असे त्याचे नाव आहे.

आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केली मुलीची हत्या

हेही वाचा -भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप; अत्याचार पीडित तरुणीच्या दुचाक्या जाळल्या

कल्याण रेल्वे स्थानकसमोरील रिक्षा-टॅक्सी स्टँडवर रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये महिलेचा अर्ध धड असलेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्या खून करणाऱ्या व्यक्तीची चेहरा तेथील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला. रेल्वेनेच आरोपी टिटवाळा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळ्या रंगांची बॅग घेऊन जात असताना दिसला. त्यावेळी ग्रामीण गुन्हे पथक, कल्याण गुन्हे शाखा आणि महात्मा फुले पोलिसांनी समांतर तपास करून आरोपी हा टिटवाळ्यातील पूर्वेकडील साईनाथ नगरमधील एका चाळीत राहत असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातच संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तर, मृत मुलीच्या मृतदेहाचा अर्धा भाग आरोपीने कुठे लपवून ठेवला की नष्ट केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

आरोपीला चार मुली असून यातील तीन मुली पत्नीसह मूळ गावी राहत आहेत. तर, मृत मुलगी आणि आरोपी बाप हे टिटवाळ्यात राहत होते. बापाने मुलीची हत्या करून त्याने घरातच मृतदेहाचे तुकडे केले. त्या पैकी शरीराचा अर्धा भाग विल्हेवाट लावण्यासाठी तो कल्याण रेल्वे स्थानकातून उतरून कोनगाव जाण्यासाठी रिक्षा पकडण्यासाठी आला होता. मात्र, रिक्षाचालकाने त्याला हटकल्याने तो बॅग सोडून पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात पळून गेला होता. आरोपी बाप हा मालाडमधील एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याच कंपनीमधून त्याला अटक केली आहे. तर, मृत मुलगी भांडूपला एका खासगी कंपनीत काम करत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details