महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल'

रविवारचा बेत आखून राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह भात शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची पाहणी केली.

सदाभाऊ खोत

By

Published : Nov 3, 2019, 4:43 PM IST

ठाणे- शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल. कारण, शेतकरी हा राज्याचा कणा असून तो कणा मोडू देणार नसल्याचे वक्तव्य कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भिवंडी तालुक्यातील पाहणी दौऱ्यात केले.

सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना

रविवारचा बेत आखून राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह भात शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची पाहणी केली.

हेही वाचा - कांदा आणखी दोन महिने आणणार डोळ्यात पाणी; पालेभाज्याही कडाडल्या

जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवल्याने हजारो हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शेतकऱ्यांनी गेल्या 15 दिवसांपूर्वीच स्थानिक जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, निवडणुकीची रणधुमाळी व त्यानंतर दिवाळी सुट्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे रखडले होते.

  • अजित पवारांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही -

अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या जाहीर केलेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका केली. शेतकऱ्यांना फक्त मदत जाहीर करून त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचत नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. गेल्या 15 वर्षात त्यांच्या आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली नसेल त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदत 5 वर्षाच्या काळात युती सरकारने केली आहे, असे सांगितले.

हेही वाचा -डेंग्यूच्या आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू, दोन महिन्यात भिवंडीत सहा जणांचे बळी

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाहणी दौऱ्यावेळी भाजपच्या खासदार आणि आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. पाहणी दौऱ्यात केवळ शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे आणि जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष दर्शन ठाकरे ही शिवसेनेची मंडळी उपस्थित होती. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर युतीमध्ये दुरावा असल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details