महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपाल दबावाखाली काम करत आहेत का? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल - भाजप शिवसेना युती

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रपती राजवटीविषयीच्या सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी भाजप राज्यपालांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.

सचिन सावंत

By

Published : Nov 7, 2019, 7:59 PM IST

ठाणे - महायुतीला स्पष्ट कौल मिळूनही राज्यपाल सत्तास्थापनेसाठी का बोलावत नाहीत, राज्यपालांना देखील दबावाखाली काम करावे लागत आहे का? असा संशय आता निर्माण झाला असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

राज्यपाल दबावाखाली काम करत आहेत का? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात शिवसैनिकच मुख्यमंत्री - सुधीर मुनगंटीवार

चौदा दिवस जनतेने कौल देऊनही, सत्ता का स्थापन होत नाही? जनतेने आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करणे ही महायुतीची जबाबदारी आहे. जबाबदारी टाळणे हा जनतेचा अनादर आहे. इतर राज्यात मात्र दुसऱ्यांची सरकारे कशी पडतील, हा भाजपचा प्रयत्न असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार राज्याच्या सद्य परिस्थितीवर बोलताना म्हणले होते की, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यावर सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रपती राजवटीची भाषा करणे पूर्णपणे दुदैर्वी आणि लोकशाही विरोधी आहे. वाढती महागाई आणि जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पादन) कमी होणे, आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे केंद्रशासनाच्या धोरणाच्या विरोधात शुक्रवारपासून आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.

हेहा वाचा - मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हीच गोड बातमी, संजय राऊतांनी भाजपला डिवचले

ABOUT THE AUTHOR

...view details