महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक - ठाणे पोलीस

सराईत चोराला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अंधेर रेल्वे स्थानकावरुन अटक केले आहे. आरोपीने तब्बल 21 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

robbery-case-mira-bhayandar-robber-is-arrested-by-thane-police
२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक

By

Published : Dec 25, 2019, 9:27 AM IST

मुंबई - घरफोडी करुन दागिणे चोरणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आरोपी राजेंद्र पटेल (वय-37) याने मिरा भाईंदर परिसरात बऱ्याचदा घरफोडी करुन चोऱ्या केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चोर आढळून आला आहे.

२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक

हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर पाठीला बॅग अडकवून रेल्वे स्थानकाच्या बाजुस चालत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चोराचा मागोवा घेतला तेव्हा तो भाईंदर किंवा मिरारोड रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे जाणारी लोकलने अंधेरी स्थानकावर उतरत असल्याचे दिसून आले. चोराच्या फोटोवरुन मुंबई परिसरात रेकॉर्ड तपासणीचे व आरोपीची ओळख पटवण्याचे काम पोलीस हवालदार किशोर वाडीले करत होते. पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यकंट आंधळे यांनी काशीमिरा गुन्हे शाखा या ठिकाणी येवून अधेरी रेल्वे स्थानकावर चोरावर लक्ष ठेवले.

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करीत असताना हवालदार जाधव व सचिन सावंतने चोराला पकडले. त्याची तपासणी केली असता बॅगमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे मिळून आली. तसेच मिरा भाईंदर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. त्याचा साथीदार रोहीत बाळकृष्ण रेशीम, याच्या मदतीने केली असल्याची कबुली दिल्याने त्या दोघांना नवघर पोलीस ठाण्यात अटक केली. दोघांना 25 डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींचे या वर्षांतील घरफोडीचे एकुण २१ गुन्हे उघडकीस झाले आहेत. त्यातील एकुण 36 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागीणे असा एकुण 36 लाख 20 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा - धक्कादायक : आईकडूनच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details