महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरक्षा रक्षकच निघाला भक्षक; तब्बल सहा लाखांवर मारला डल्ला - WATCHMEN THIEF

उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक. ३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस अपार्टमेंटधील होलचंदानी यांच्या घरातील तब्बल सहा लाख रुपये चोरी गेल्याची घटना घडली आहे.

robbery
सुरक्षा रक्षकच निघाला भक्षक; तब्बल सहा लाखांवर मारला डल्ला

By

Published : Jan 31, 2020, 8:54 PM IST

ठाणे - एका इमारतीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्याच्या 3 सहकाऱ्यांसह घरफोडी करुन 6 लाख 12 हजार रुपयाची रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील शांतीनगर परिसरात 'कोहिनूर वेस' या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला व त्यांना एकाला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे तर 2 फरार झाले आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये अमित होलचंदानी हे आपल्या कुटूंबासह राहतात. अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी मनिष, कृष्णा, अनिल हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आपसात संगनमत करुन अमित यांच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन येवून बेडरुमच्या खिडकीचे ग्रील उचकवून घरात प्रवेश केला. शेअर्स कागपत्रासह तब्बल 6 लाख 12 हजार रुपयाची रोख रकमेवर डल्ला मारला.

हेही वाचा - फर्रुखाबाद: ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका; पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details