महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Robber Arrested : गोळीबारात जखमी करत दोन कोटीचा ऐवज लुटला; दरोडेखोराला कल्याण रेल्वे स्थानकात अटक - गोळीबार करून जखमी केले आणि लुटमार

ठाणे हद्दीतील एका घरावर दरोडा टाकून एकावर गोळीबार (Robber Gunshot injured and looted) करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर घरातील २ कोटींचा ऐवज लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला कल्याण रेल्वे स्थकानात सापळा रचून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या (robber arrested at Kalyan railway station) आहे. Latest news from Thane, Thane crime, Robber Arrested

Robber Arrested
दरोडेखोराला अटक

By

Published : Nov 23, 2022, 8:22 PM IST

ठाणे : पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका घरावर दरोडा टाकून एकावर गोळीबार (Robber Gunshot injured and looted) करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर घरातील २ कोटींचा ऐवज लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला कल्याण रेल्वे स्थकानात सापळा रचून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या (robber arrested at Kalyan railway station) आहे. ईमरान तेजाउद्दीन अन्सारी ( वय ३२, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. Latest news from Thane, Thane crime, Robber Arrested

पोलिसांनी रचला सापळा :दरोडेखोरांमधील सहभागी असलेला ईमरान अन्सारी हा दरोडेखोर आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी –कल्याण येथे येण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आसनसोल दुर्गापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमित हल्डर यांनी मंगळवारी सकाळी रेल्वेने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना स्वताची ओळख दिला. १४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आसनसोल पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोर इमरान अन्सारी आणि त्याच्या दोन साथीदारांनी सुनील कुमार अग्रवाल यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दोन कोटी किमतीचा ऐवज पळून जात असताना घर मालक सुनील कुमार अग्रवाल यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते.

पोलिसांची चलाखी आली कामी :या तीन दरोडेखोरांमधील दरोडेखोर इमरान हा आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी –कल्याण येथे येण्यासाठी निघाला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हल्डर यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना दिली. विशेष म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी आसनसोल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये दरोडेखोर इमरान अन्सारी कल्याणला आसनसोल एक्सप्रेसने येत असल्याचे पश्चिम बंगालच्या पोलिसांना दिसून आले होते. त्यामुळे दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने इमरानला पकडणे खूप महत्वाचे होते. कल्याणचे रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक उपनिरीक्षक रतन सिंह यांनी तातडीने आपल्या सहकारी जवानांचे एक पथक तयार केले. उपनिरीक्षक हल्डर यांच्या बरोबर आसनसोल एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात ज्या फलाटावर येते, तिथे रेल्वे पोलीस पथकाने २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळची साडेपाच वाजल्याच्या सुमारास सापळा रचला होता. बरोबर संध्याकाळी साडे पाच वाजता आसनसोल एक्सप्रेस कल्याण स्थानकातील पाच नंबर फलाटावर येताच, इमरान ज्या बोगीत बसला होता. त्या बोगीच्या चारही बाजुने पोलिसांनी सापळा आदीच रचला होता.

अखेर आरोपीला अटक :त्यावेळी पश्चिम बंगालचे पोलीस उपनिरीक्षक हल्डर यांनी आरोपी इमरानला बोगीतून उतरताना पाहताच त्यांच्या इशाऱ्यावरुन सापळा रचलेल्या रेल्वे पथकाने त्याला १ नंबर फलाटावर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोर इमरानने पोलीस पथकाला झटका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिस पथकातील जवानांनी त्याच्या जागीच मुसक्या आवळल्या. आज दरोडेखोर इमरानला विशेष रेल्वे पोलीस पथकाच्या मदतीने पुन्हा पश्चिम बंगाल मधील आसनसोल येथे तपासकामासाठी बंदोबस्तात घेऊन गेल्याची माहिती कल्याण रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details