ठाणे : प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत ( Rob to passenger by threating with gun )असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना भिवंडी येथील भादवड नाका ते सोनाळे या मार्गावर सापळा रचून शांतीनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या ( accused arrested in bhivandi thane ) आहेत. शुभम मिश्रा (वय, २५), आशिष श्रीवास्तव (वय, ३६) असे बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी बंदूक सारखे दिसणारे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसेसह व एक दुचाकी हस्तगत केली आहे.
अशी आली माहिती समोर - कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. त्यातच आगामी महापालिका निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून भिवंडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनीही शांतीनगर पोलिसांना गुन्हेगाराला आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार उपनिरीक्षक निलेश जाधव हे त्यांच्या पथकासह मंगळवारी भादवड नाका येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गस्ती घालत होते. त्याच वेळी दोन सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची, माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.