महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Road Dug In Diva: मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला रस्ता पुन्हा एकदा खोदला; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला रस्ता पुन्हा एकदा खोदला गेला. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत दिवा आगासन येथील रस्त्याचे लोकार्पण झाले होते. नागरिकांसाठी खुला केलेल्या नवीन रस्त्याखालच्या जलवाहिनीला वॉल्व लावले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बनवण्यात आलेला रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Road Dug In Diva
दिवा शहरात रस्त्याचे खोदकाम

By

Published : Jun 20, 2023, 9:54 AM IST

दिवा शहरात रस्त्याचे खोदकाम, नागरिकांना त्रास

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 जुन रोजी दिवा शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी दिवा आगासन येथील 66 कोटी रुपये खर्च करुन नव्याने बनवलेल्या रस्त्याच देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करून नागरिकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला होता. मात्र या रस्त्याखालच्या नवीन जलवाहिनीला व्होल्व लावले नसल्याने आतील आतील पाईपलाईन फुटून त्यातील पाणी रस्त्यावरती आले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा खोदून दुरुस्तीचा काम हाती घेण्यात आले आहे.

पाईपलाईन दुरुस्तीचे काम : ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण होणार होते. त्याच्या एक दिवस आधी रात्री याच ठिकाणची पाईपलाईन फुटून रस्त्यावरचे पाणी बाहेर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री दिवा शहरात पोहोचण्याआधीच तातडीने याच पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण करून काही दिवस उलटत नाही, तर पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करत तक्रार केली आहे.

आमदार राजू पाटीलांचे ट्विट : या रस्त्यावर खर्च झालेले 66 कोटी रुपये हे कोणाच्या घरचे नाही, तर जनतेने घाम गाळून कमावलेले आहेत याची जाणीव आपणासही असेलच. आपण लोकार्पण केलेल्या दिवा आगासन रस्ता व नवीन जलवाहिनीची काम अजून पूर्ण झाली नाही. आपणास दिव्यातील तुमचे माजी नगरसेवक व पदाधिकारी अंधारात ठेवत आहेत, यावर आम्ही काहीही केले तरी आपल्या समर्थकांना व आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला त्याचे राजकारण दिसते. म्हणून माझी आपणास विनंती आहे की, दिवा भागात राहणाऱ्या सुमारे 4 लाख नागरिकांसाठी एकदा तटस्थपणे आढावा घ्या. आपणास दिव्यातला अंधार दिसेल, असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.



भाजपही आक्रमक : गेल्या पाच वर्षात दिवा शहराला 800 कोटींचा निधी आला. या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. महापालिका प्रशासनाने उघडपणे याकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्याच्या पाईपलाईनसाठी 221 कोटींचा निधी आणल्याचे बोलले जात आहे. पण हा निधी गेला कुठे? उद्घाटनाच्या एक दिवस अगोदरच ही पाईपलाईन फुटते, रस्ता बनवताना या ठिकाणी वॉल बसवले गेले नाही. ही बाब पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना लक्षात आली नाही का? असा सवाल दिवा शहरातील भाजप पदाधिकारी आणी नागरिकांनी विचारला आहे. पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली आहे. या प्रकरणाविषयी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि माजी सेवकांना विचारला असता यावर बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे.

हेही वाचा :

  1. Shivsena Anniversary : 'तुम्हीच गद्दारी केली, फक्त तारीख विसरलात', एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
  2. Ajit Pawar Statement: शेतकऱ्यांच्या अडचणीकडे डोळे झाक करून सुरू आहे पोरखेळ - अजित पवार
  3. Shivsena UBT anniversary : 'इथे गर्दी तर तिथे गारदी' उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, भाजपची राज्य करण्याची लायकी नसल्याचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details