महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ, ठाण्याच्या मेंटल रुग्णालयात पुन्हा भरती - rise-in-number-of-psychiatric-patients

लॉकडाऊनचा परिणाम अनेक उद्योजक, व्यवसाय आणि सामान्य नागरिक यांच्यावर झाला आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात असलेल्या रुग्णांना देखील कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बसला असल्याचे समोर आले आहे. कोरोना येण्यापुर्वी कमी झालेले रुग्ण पुन्हा वाढले असून चिंता व्यक्त केली जात आहे. या काळात जवळपास ३०० ते ३५० मनोरुग्ण वाढले आहेत. रुग्ण वाढल्याची कारणे धक्कादायक आहेत.

लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ
लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ

By

Published : Jan 29, 2021, 2:29 PM IST

ठाणे - अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या व्यसनींना लॉकडाऊन काळात हे पदार्थ न मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे अशा जवळपास १०० जणांना पुन्हा एकदा मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कडक लॉकडाऊनमुळे उपचारासाठी वेळोवेळी रुग्णालयात येता आले नाही. त्यामुळे पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली असे जवळपास दीडशे रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना काळात जवळपास ३०० ते ३५० मनोरुग्ण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ
लॉकडाऊनचा परिणाम अनेक उद्योजक, व्यवसाय आणि सामान्य नागरिक यांच्यावर झाला आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात असलेल्या रुग्णांना देखील कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बसला असल्याचे समोर आले आहे. कोरोना येण्यापुर्वी कमी झालेले रुग्ण पुन्हा वाढले असून चिंता व्यक्त केली जात आहे. या काळात जवळपास ३०० ते ३५० मनोरुग्ण वाढले आहेत. रुग्ण वाढल्याची कारणे धक्कादायक आहेत. अमली पदार्थाचे व्यसन असणाऱ्यांना लॉकडाऊन काळात हे अमली पदार्थ न मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. त्यामुळे त्यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे जवळपास १०० रुग्ण उपचार घेत आहेत.

लॉकडाऊनमुळे इस्पितळात येता आले नाही

दुसरे धक्कादायक कारण म्हणजे लॉकडाऊच्या आधी जवळपास १५० मनोरुग्ण बरे होऊन घरी गेले होते. परंतु ते आता पुन्हा मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. लॉकडाऊन काळात त्यांना उपचारासाठी वेळोवेळी रुग्णालयात येता आले नाही. त्यामुळे पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली, असे 150 रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नैराश्य हे मोठे कारण -

कोरोना काळात अनेक लोकांची नोकरी गेली तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेत. याचा परिणाम काहींच्या मनावर होऊन त्यांची मानसिक स्थिती बिघडली. त्यामुळे काहींना मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा गंभीर परिणाम रुग्णांवर झाला असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.

50 टक्के रुग्ण वाढले-

कोरोनाच्या आधी रुग्णांची परिस्थिती उत्तम होती. मात्र पुन्हा अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यानंतर रुग्णालयात भरती सुरू झाली आहे. मागील वर्षी 700 रुग्ण होते, आता मात्र जवळपास ३०० ते ३५० नवीन रुग्णाची भर पडली आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे नशेच्या आहारी गेलेल्या रुग्णांना अमली पदार्थ न मिळाल्याने संतप्त झाल्याचे दिसून आले होते. एकप्रकारे चिंतेची बाब असून या सर्व रुग्णावर उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.

हेही वाचा -'लाल किल्ल्यातील घटनेआडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारू शकत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details