ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात रेल्वेच्या सेवानिवृत्त टीसीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या करून त्यांचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. या हत्येचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार असून गुन्हे शाखा पथक त्याचा शोध घेत आहे.
मृतदेह खड्डयात पुरला : गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी शिवनेर फर्डेपाडा गावात आरोपीच्या शेतात एक मृतदेह खड्डयात पुरलेल्या स्थितीत मिळाला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतकाच्या चेहऱ्यावर जखमा केल्या होत्या. तपासादरम्यान पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे फोटो, वर्णन आणि नावे प्राप्त केली. त्यानंतर मृतदेहाच्या बोटातील अंगठीवरून ओळख पटवण्यात आली. गोपाळ नायडू असे मृतकाचे नाव असून ते रेल्वेतील सेवानिवृत्त टी.सी होते.
अंगठीवरून पटली मृतदेहाची ओळख-हत्येचा प्रकार भयानक असल्याचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश मनोरे यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस पथके तयार केली. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या होत्या. तर मृताच्या अंगात केवळ बनियान आणि अंडरवेअर होते. त्यामुळे मुतदेहाची ओळख पटविण्याचे पोलीस पथकासमोर आवाहन होते. तपासादरम्यान ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे फोटो, वर्णन आणि नाव प्राप्त केली. त्यानंतर मृतदेहाच्या हातातील बोटात असलेल्या अंगठीवरून ओळख पटविली असता मृतक कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे राहणारा गोपाळ रंगया नायडु असून ते सेवानिवृत्त टी.सी असल्याचे निष्पन्न झाले.
हत्या केल्याची दिली कबुली..मृत गोपाळ हे ११ जूनपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने मृतकच्या नातेवाईकांना मृतदेह दाखवला असता त्यांनी गोपाळ नायडु यांचाच मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यात मृतदेह देऊन गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने कोणताही धागादोरा नसताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक तपास केला. हत्या करणारे आरोपीचा कसोशीने शोध घेऊन अरुण जग्गनाथ फर्डे, आणि सोमनाथ रामदास जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केला असता त्यांनी फरार मुख्य आरोपी रमेश मोरे सह तिघांनी मिळून टीसीची हत्या केल्याची कबुली गुन्हे शाखेचा पथकाला दिली.
उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने हत्या:धक्कादायक बाब म्हणजे फरार मुख्य आरोपी मोरे याने मृतक गोपाळ यांच्याकडून 16 लाख रुपये उसने घेतले होते. तेच उसने पैसे परत मिळण्यासाठी मृतक गोपाळ हे मुख्य आरोपी मोरे याच्याकडे तगादा लावत होते. त्याचाच राग मनात धरुन मुख्य आरोपी मोरे याने दोन साथीदाराच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. ११ जूनपूर्वी म्हणजे घटेनच्या आदी मृत गोपाळ यांना उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या आरोपी अरुण फर्डे याच्या शेतात नेऊन दारूची पार्टी केली. त्यानंतर गोपाळ यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह शेतातील एका खड्यात पुरल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही आरोपी विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ जूनपर्यंत पोलीस कोठडी : पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली. अरुण फर्डे (वय ३२ रा. धसई , फर्डेपाडा ता. शहापुर) आणि सोमनाथ जाधव (वय ३५ रा. टावरीपाडा, कल्याण पश्चीम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रमेश मोरे ( रा. टिटवाळा) असे फरार असलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. शहापूर पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
- Beed Murder Case: ऊसतोड मजुराचा डोक्यात दगड घालून खून; घटनास्थळी पोलीस दाखल
- Karnataka Crime News : ऑनर किलिंग! वडील व भावाने अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली
- Thane Crime News: मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह? भर रस्त्यात झाला दुकानदारावर कोयत्याने हल्ला