ठाणे- संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. या विषाणूला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने काही कायदे लागू केले आहेत. मात्र, नागरिकांकडून या कायद्यांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. लॉकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण शहरात फिरत आहे. पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. त्यामुळे, शहरात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांनी घरीच रहावे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त विवेक फणसालकर यांनी केले.
'तुमच्यासाठी झटणाऱ्या यंत्रणांचा आदर करा, घरात राहून त्यांना सहकार्य करा!' - ठाणे
पोलीस आयुक्त फणसालकर यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्र्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची त्यांनी भेट घेतली.
!['तुमच्यासाठी झटणाऱ्या यंत्रणांचा आदर करा, घरात राहून त्यांना सहकार्य करा!' corona thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6608117-thumbnail-3x2-op.jpg)
शहर पोलीस आयुक्त विवेक फणसकर
माहिती देताना पोलीस आयुक्त विविक फणसालकर
पोलीस आयुक्त फणसालकर यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्र्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची त्यांनी भेट घेतली. पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे सर्वजण कोरोनाविरुद्ध लढत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त विवेक फणसालकर यांनी केले.