महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट - शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ न्यूज

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(सिडको)निर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. घराचे स्लॅब पडणे, भिंतीचे प्लॅस्टरचे तुकडे निखळून पडणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

घराचा पडलेला स्लॅब

By

Published : Oct 27, 2019, 10:11 AM IST

Updated : Oct 27, 2019, 2:39 PM IST

नवी मुंबई -शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(सिडको)निर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन दशकांपासून नागरिक जीव मुठीत घेवून राहत आहेत. घराचे स्लॅब पडणे, भिंतीचे प्लॅस्टरचे तुकडे निखळून पडणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.


नवी मुंबईची निर्मित्ती करताना सिडकोने नवी मुंबईच्या अनेक भागांत निवासी इमारती बांधल्या. काही कालावधीत इमारतींची पडझड सुरू झाली. तेव्हापासून या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न चर्चेत आहे. याच प्रश्नावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र, ३५ वर्षांनंतरसुद्धा हा प्रश्न 'जैसे थे'च राहिला आहे. राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी एफएसआय(फ्लोअर स्पेस इंडेक्स)ची घोषणाही केली आहे. मात्र, त्याची अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे रहिवासी संभ्रमात आहेत.

सिडको निर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हेही वाचा - आदित्य ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल


वाशी येथील सप्तगिरी सोसायटीतील सेक्टर ९ मधील ७क्रमांकाच्या ईमारतीत राहणाऱ्या जेम्स जोसफ यांच्या स्वयंपाक घरातील छत निखळून पडले. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेले जोसफ कुटुंबिय थोडक्यात बचावले. अशा पध्दतीची पडझड होणे नेहमीचीच बाब झाल्याने नागरिक या घरांत भीतीच्या सावटाखाली राहत आहेत.

Last Updated : Oct 27, 2019, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details