ठाणे - भिवंडी तालुक्यातील गोवे सरवली येथील औद्योगीक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) राष्ट्रीय दुग्धविकास विभागातर्फे दुग्धप्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारली आहे. त्याठिकाणी मदर डेअरी फुड अँड व्हेजिटेबल या कंपनीकडून काम सुरू आहे. या डेअरीमध्ये स्थानिक ग्रामस्थांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी गोवे सरवलीच्या ग्रामस्थांनी मदर डेअरीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले आहे.
भिवंडीतील मदर डेअरीमध्ये स्थानिकांना रोजगार द्या; ग्रामस्थांचे आंदोलन - राष्ट्रीय दुग्धविकास विभाग न्यूज
गोवे सरवली ग्रामपंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहत आहे. सध्या या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून प्रकल्प उभारला जात आहे. या नवीन प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांनी केली.
गोवे सरवली ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहत आहे. येथेच महाराष्ट्र दुग्ध विकास महामंडळाची डेअरी ही व्यावसायिक कंपनी आहे. या कंपनीचे हस्तांतर राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून प्रकल्प उभारला जात आहे. या नवीन प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सातत्याने केली. मात्र या मागणीला प्रशासनकडून नकार देण्यात आला आहे.
हेही वाचा - माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?
प्रशासनाने नकार दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला. संतप्त ग्रामस्थांनी मदर डेअरीच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनासोबत चर्चा केली. सोमवारपर्यंत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.