नवी मुंबई- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास बरा झाल्याचे सांगून जबरदस्तीने रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, संबंधित रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. तसेच 7 दिवसांत रुग्णाला अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेले आहे. याबाबत मनसेला माहिती मिळताच मनसे आक्रमक झाली असून रुग्णालयावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. या अगोदरही अव्वाच्या सव्वा बिल आकारण्याचा प्रकार नवी मुंबईतील सानपाड्यात घडला होता.
घरी पाठवलेल्या रुग्णाचा दोनच दिवसात रिपोर्ट पॉझिटिव्ह... नवी मुंबईतील फोर्टीज रुग्णालयातील प्रकार - thane corona
नवी मुंबईतील फोर्टीज या खासगी रुग्णालयाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. एका कोव्हिड रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन 7 दिवसातच त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला रुग्णालयातून जबरदस्तीने घरी पाठविण्यात आले.
घरी पाठवलेल्या रुग्णाचा दोनच दिवसात रिपोर्ट पॉझिटिव्ह...
एकूणच या फोर्टीज रुग्णालयाने 7 दिवसात तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांचे बिल वसूल तर केले वर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे खोटे सांगितले. रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णाला मानसिक त्रास झाला असून रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात घातला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली असून फोर्टीज रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.