ठाणे - जिल्ह्यात ग्रामीण शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारने श्रमिकांसाठी चालू केलेल्या ई-श्रमिक रोजगार या योजनेचे नाव बदलून ते ई-शिव आधार कार्ड असे केले आहे. ठाणे जिल्ह्यात या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून जिल्ह्यात घरोघरी हजारो लाभार्थांना लाभ देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे, असे ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या उपक्रमास भरघोस प्रतिसाद -
कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई-श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र ही योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई - श्रमिक रोजगार ही योजना ई - शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत.
असा मिळतो योजनेचा लाभ -
- अपघाती विमा १ लाख
- आरोग्य कुटूंब विमा २ लाख
- बेरोजरांना रोजगार भत्ता, तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो.