महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२६ जुलै : प्रलयकारी महापुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारा दिवस - २६ जुलै २०१९ महापूर बातमी

२६ जुलै २००५ या प्रलयकारी दिवसाला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. तर गेल्याच वर्षी २००५ ची आठवण करून देणारा महापूर २६ जुलै २०१९ रोजी आला होता. न विसरता येणारा भीषण दिवस. त्या प्रलयंकारी पावसाच्या आठवणींना पंधरा वर्ष होत असताना आजही आपण सुरक्षित नसल्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात कायम आहे. याला प्रशासनाचा धीमा आणि भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप आजची आठवण म्हणून नेटकऱ्यांमधून केला जात आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारा दिवस
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारा दिवस

By

Published : Jul 26, 2020, 4:47 PM IST

ठाणे :महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये २६ जुलै २०१९ रोजी २ हजाराच्या जवळपास प्रवाशी प्रवासाला निघाले होते. मात्र, महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर ते वांगीण रेल्वे स्थानकादरम्यान प्रलयकारी महापुराच्या पाण्यात अडकली होती. त्यावेळी या एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ४८ तासानंतर त्यांची सुटका करून सुखरूप बाहेर काढले होते. विशेष म्हणजे त्या घटनेनंतर मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास आठवडाभर बंद होती. तर त्या दिवसाच्या आठवणीने आजही महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात धडकी भरत आहे.

जोरदार पाऊस पडला की पुराचे पाणी साचणं हे ठाणे जिल्ह्यतील विविध भागासाठी नवीन नाही. मात्र २६ जुलै या दिवशी भूतो न भविष्यती असा पाऊस पडला आणि बदलापूर अंबरनाथ परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली. २६ जुलै २००५ या प्रलयकारी दिवसाला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. तर गेल्याच वर्षी २००५ ची आठवण करून देणारा महापूर २६ जुलै २०१९ रोजी आला होता. न विसरता येणारा भीषण दिवस. त्या प्रलयंकारी पावसाच्या आठवणींना पंधरा वर्ष होत असताना आजही आपण सुरक्षित नसल्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात कायम आहे. याला प्रशासनाचा धीमा आणि भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप आजची आठवण म्हणून नेटकऱ्यांमधून केला जात आहे.

उल्हास नदीमुळे २००५ आणि २०१९ या दोन्ही वर्षांत २६ जुलैला आलेल्या महापुराचा फटका बदलापूरसह ठाणे जिल्ह्यातील हजारो रहिवाशांना बसला. यातील अनेक कुटुंबांचे आयुष्य, संसार आणि व्यवसाय पुरांमुळे उद्ध्वस्त झाले. उल्हास नदी ही लांबीच्या दृष्टीनं कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो. पुढे पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती 122 किलोमीटरचं अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. उल्हास नदी आणि तिच्या खाडीच्या काठावर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे अशी शहरं आणि नेरळ, पाषाणे, वांगणीसारखी गावं वसली आहेत.

२६ जुलै २००५ च्या दिवशी मुंबईत मीठी नदीच्या प्रलयात झालेला विध्वंस सर्वांना आठवत असेल. पण त्या दिवशी उल्हास नदीलाही पूर आला होता. त्याचवेळी ब्रिटिशकालीन बांधलेल्या बॅरेजचे (छोटं घरण) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. इतकेच नाही तर वांगणी बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेचा ट्रॅक उल्हास नदीच्या अगदी जवळून म्हणजे काही फूटांवरून जातो. २६ जुलै २०१९ रोजी महालक्ष्मी एक्सप्रेस ज्या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकली होती. तोच भाग आजही सखलच आहे. मध्यतंरी या सखल भागातील रुळांची उंची वाढवण्याचा रेल्वेचा प्रस्ताव होता. तसेच उल्हास नदीच्या पात्रात आणि महाराष्ट्र राज्य शासनाने नदीपात्र परिसरात बांधकाम करण्यासंदर्भात घालून दिलेल्या अटी आणि शर्ती उल्लंघन करून वाढता शहराचा विस्तार पूररेषेच्या आतच असलेली बांधकामं यामुळे पूराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पूररेषेच्या आतील बांधकामांना जोपर्यंत आळा बसणार नाही. तोपर्यंत उल्हास नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पुराचा धोका कायम राहणार आहे.

२६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या उल्हास नदीच्या त्या पुलामुळे पुन्हा सातत्याने आठवडाभर जरी पाऊस पडला तर २६ जुलैच्या आठवणी ताज्या होतील. बदलापूर ते वांगीण रेल्वे स्थानकादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस प्रलयकारी महापुराच्या पाण्यात अडकली होती तेव्हा त्याचा प्रत्यय आला. मात्र, त्याची दखल अद्यापही शासनाकडून घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details