ठाणे -रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शन लाइफ सेव्हिंग इंजेक्शन नसल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी इतर अनेक इंजेक्शने औषधेही सोईचे आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर व प्लाज्मासाठी वेठीस धरू नये, अशा सूचनाही सर्व डॉक्टरांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डॉक्टरांना रुटीन सर्जरी पुढे ढकलण्याचे अवाहन
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या बचावासाठी रुटीन सर्जरी पुढे ढकलण्यात यावे, जेणेकरून या ऑक्सिजनचा वापर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकेल, असे अवाहनही महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी डॉक्टरांना केले आहे.