महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्लेखनीय..! कचऱ्यात जाणाऱ्या पादत्राणांवर प्रक्रिया करून गोरगरिबांना मोफत वाटप... - चपलांवर पक्रिया

आजच्या आधुनिक युगात नव्या फॅशननुसार प्रत्येक घरात किमान तीन ते चार जोड जुन्या चपला, बूट, सँडल आढळतात. जुनी पादत्राणे अडगळीत पडून राहिली की मुलांच्या वाढत्या वयोमानानुसार त्याचा उपयोग शून्य होतो. अखेर जुन्या चपला टाकण्याकडे अनेक पालकांचा भर असतो. पर्यावरणाला हानी पोहोचवणारी ही जुनी पादत्राने कचऱ्यात न टाकण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना केलं जातं आहे. पालिकेच्या या उपक्रमाला नागरिक चांगला प्रतिसाद आहेत.

nmfootwar
उल्लेखनीय..! कचऱ्यात जाणाऱ्या पादत्राणांवर प्रक्रिया करून गोरगरिबांना मोफत वाटप...

By

Published : Dec 17, 2019, 9:31 AM IST

Updated : Dec 17, 2019, 9:37 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्यात जाणाऱ्या पादत्राणांवर प्रक्रिया करून त्यांचे गोरगरीब व गरजूंना वाटप करण्यात येत आहेत. सिथेंटिक मटेरिअल, प्लास्टिक, फोम याचे कंपोस्टिंग होत नसल्याने त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून जुनी पादत्राणे गोळा करुन त्याचं रिसायकलिंग करण्यात येत आहे. याद्वारे तयार झालेल्या नवीन चप्पल, बुटांचं शाळेतील लाखो मुलांना मोफत वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे टाकाऊ पासून टिकाऊ हा अभिनव प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे.

उल्लेखनीय..! कचऱ्यात जाणाऱ्या पादत्राणांवर प्रक्रिया करून गोरगरिबांना मोफत वाटप...

आजच्या आधुनिक युगात नव्या फॅशननुसार प्रत्येक घरात किमान तीन ते चार जोड जुन्या चपला, बूट, सँडल आढळतात. जुनी पादत्राणे अडगळीत पडून राहिली की मुलांच्या वाढत्या वयोमानानुसार त्याचा उपयोग शून्य होतो. अखेर जुन्या चपला टाकण्याकडे अनेक पालकांचा भर असतो. पर्यावरणाला हानी पोहोचवणारी ही जुनी पादत्राने कचऱ्यात न टाकण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना केलं जातं आहे. पालिकेच्या या उपक्रमाला नागरिक चांगला प्रतिसाद आहेत.

सिथेंटिक मटेरिअल, प्लास्टिक, फोम यांची विल्हेवाट लागत नसल्याने त्याचं विघटन होत नसल्याने ते कचऱ्यात तसेच साचून राहतात. काही महिन्यात केमिकलयुक्त रसायन बाहेर पडून याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी जुनी पादत्राणे पालिकाच गोळा करेल असा अभिनव उपक्रम हाती घेतला. महापे एमआयडीसी मध्ये असलेल्या ग्रीन सोल कंपनीबरोबर समन्वय साधत जुन्या पादत्राणांवर रिसायकलिंग करण्यात येत आहे. यातून नवीन पर्यावरणपुरक लहान मुलांचे चप्पल, सँडल, बूट तयार करण्यात आले आहेत. आदिवासी पाडे, अनाथालय अशा शाळांमध्ये मोफत वाटप करण्यात येत आहे. देशात १५ राज्यातील लाखो विद्यार्थांना याचं वाटप करण्यात येत आहे.

Last Updated : Dec 17, 2019, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details