नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC Market) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ४८०० ते ५५००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २३०० ते २५०० रुपये. काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये दर (APMC Market Navi Mumbai) आहेत.
कारली प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १३०० रुपये ते २००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३४००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये दर ( Vegetables Rate Today in APMC Market Navi Mumbai) आहेत.
पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२००रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये दर आहेत.