महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rat Eating Pav bhaji: पावभाजी सेंटरमध्ये उंदराचा सुळसुळाट, व्हायरल व्हिडिओ होताच एफडीए अधिकाऱ्याने दिला कारवाईचा इशारा - ठाणे पावभाजी

Rat Eating Pav bhaji : आपल्याला रस्त्यावरील उघड्या काउंटरवरील पावभाजी खायला फार आवडते. पण अनेकदा हे जीवघेणं देखील ठरू शकतं. ठाण्यातून असाच एक प्रकार समोर आलाय. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित होतोय. नक्की हे प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेवू या.(pav bhaji viral video)

Rat Eating Pavbhaji
पावभाजी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 8:07 PM IST

उंदीर घेतोय पावभाजीचा आस्वाद

ठाणे Rat Eating Pav bhaji : ठाणे स्टेशन जवळील एका पावभाजीच्या दुकानात चक्क उंदीर पावभाजीचा आस्वाद घेत असल्याची घटना घडलीय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये 'कॅनन पावभाजी अँड स्नॅक्स' या दुकानात उंदरांचा सुळसुळाट पहायला मिळतोय. त्यामुळे सर्व खवय्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणी कारवाईची मागणी होतेय.


पावभाजी बनवण्याचं काम उघड्यावरच :पावभाजी हा सर्वांचाच आवडता खाद्यपदार्थ आहे. जेवणाऐवजी अनेक खवय्ये याच पावभाजीला आपली पसंती देतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ठाण्यातील पावभाजी सेंटरवरcgNs नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केलाय. पावभाजी बनवण्याचं काम उघड्यावरच सुरूय. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, असं असतानाही कोणतंही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही? अन्न आणि औषध प्रशासन काय लक्ष ठेवते? असा सवाल ठाणेकर विचारात आहेत. (rat eating pavbhaji viral video)

स्थानकाबाहेर मोठी गर्दी :ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पावभाजी सेंटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट पहायला मिळालाय. मोठे उंदीर या पावभाजी सेंटरमध्ये मुक्त संचार करत आहेत. ही दृश्य बघताना अंगावर शिसारी येते. उंदरांमुळे लेप्टोस्पायरॉसिस सारखे अनेक जीवघेणे आजार पसरतात. त्यामुळे त्यांच्या हॉटेलमधील या मुक्तसंचारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. (pavbhaji viral video)



पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप :ठाणे स्थकानाच्या बाहेर या व्यावसायिकांचे अहोरात्र व्यवसाय सुरू असतात. पालिकेचे, पोलिसांचे कोणतेही नियम यांना लागू होत नाहीत. या ठिकाणी रात्री अनेकदा हाणामाऱ्या देखील झाल्या आहेत. मात्र, तरी देखील ठाणे पोलीस यावर कारवाई करत नाही. या प्रकारात पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप स्थानिक समाजिक कार्यकर्ते तुषार रसाळ यांनी केलाय. पालिकेचे पाणी अवैधरित्या वापरत अवैध शेड उभारून हे जीवघेणे व्यवसाय सुरू आहेत. यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संगम डोंगरे यांनी केलीय.

कठोर कारवाई केली जाईल-अधिकाऱ्याचा इशारा-अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी तातडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची कोणती गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याला बाधा होईल, असे प्रकार नागरिकांना कळाले तर त्यांनी तात्काळ अन्न औषध प्रशासनाला कळवावे असे आवाहन देखील सुरेश देशमुख यांनी केले आहे. कॅनोन पावभाजी संदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असे देखील देशमुख यांनी सांगितले.


हेही वाचा :

  1. हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये आढळले मुदतबाह्य अन्नपदार्थ; चंद्रपुरातील प्रकार
  2. दिवाळीच्या काळात केवळ एका आठवड्यात राज्यातून सुमारे सव्वा चार कोटींचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
  3. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हाणीकारक अन्नपदार्थ वितरीत, एक्सपायरी डेट नसलेल्या दुधाचे होते वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details