महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशी पेस्टल बॉल अजगरासह दुर्मिळ पांढरा मुंगूस जप्त; ठाणे वनविभागाची कारवाई - परदेशी पेस्टल बॉल अजगर

सोहम मंगेश पेडनेकर, असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. ठाणे वनविभागाच्या उप वनरक्षकांकडे ३१ जानेवारीला तक्रार अर्ज दाखल झाला होता. आरोपीकडून परदेशी पेस्टल बॉल अजगर, सरडा ,घोरपड आणि दुर्मिळ पांढरा मुंगूस, असे वन्यप्राणी वनविभागाने जप्त केले आहे.

परदेशी पेस्टल बॉल अजगरासह दुर्मिळ पांढरा मुंगूस जप्त
परदेशी पेस्टल बॉल अजगरासह दुर्मिळ पांढरा मुंगूस जप्त

By

Published : Jan 31, 2020, 11:40 PM IST

ठाणे - परदेशी वन्यप्राणी जवळ बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या एकाला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून परदेशी पेस्टल बॉल अजगर, सरडा ,घोरपड आणि दुर्मिळ पांढरा मुंगूस, असे वन्यप्राणी वनविभागाने जप्त केले आहे.

परदेशी पेस्टल बॉल अजगरासह दुर्मिळ पांढरा मुंगूस जप्त

सोहम मंगेश पेडनेकर, असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. ठाणे वनविभागाच्या उप वनरक्षकांकडे ३१ जानेवारीला तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार वनविभागाने धाडसत्र करून सोहम याला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details