महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळिमा; ४२ वर्षीय नराधम मामाने केला ६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार - thane latest news

नराधम मामा हा शेजारी राहत असून त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेवर वारंवार तिचा विनयभंग करून अत्याचार करत होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना पहिले असता त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली.

rape on minor niece in ulhasnagar, thane
४२ वर्षीय नराधम मामाने केला ६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार

By

Published : Sep 17, 2021, 1:59 AM IST

Updated : Sep 18, 2021, 12:03 PM IST

ठाणे -मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आली आहे. एका ६ वर्षाच्या भाचीवर नराधम ४२ वर्षीय मामाने बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नराधामाविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

खेळण्याच्या बहाण्याने घरी नेत केला अत्याचार -

नराधम मामा हा शेजारी राहत असून त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेवर वारंवार तिचा विनयभंग करून अत्याचार करत होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना पहिले असता त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली.

नराधमाला ४ दिवसांची पोलीस कोठडी -

हिललाईन पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी नराधम शेजारी राहत असून तो पीडित मुलीचा विनयभंग करून अत्याचार करीत होता. आरोपी आणि पीडित कुटुंब भाजी विक्रेते म्हणून काम करतात. तर गुन्हा दाखल होताच पीडितेवर वैद्यकीय उपचारकरून आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -पिंपरीत 12 वर्षीय मुलाने केला 4 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Last Updated : Sep 18, 2021, 12:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details